घटस्फोटाची मागणी करत पतीची बायकोला रस्त्यात मारहाण
मित्रांच्या मदतीने पतीची पत्नीला बेदम मारहाण, वडगाव शेरी येथील घटना, गुन्हा दाखल
पुणे दि ८(प्रतिनिधी)- घटस्फोटाची मागणी केत पतीने भर रस्त्यात मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला आहे. यावेळी संतापलेल्या पतीने भर रस्त्यात मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केली. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी येथे हा प्रकार घडला. यामुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदन नगर पोलीस ठाण्यात या महिलेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या भाजी घेण्यासाठी मुंढवा रस्त्यावरून पायी जात होत्या. यावेळी तिचा पती त्या ठिकाणी आला. त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही होते. पतीने पत्नीला शिवीगाळ करून ‘मला सोडचिठ्ठी दे’, असं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर या महिलेच्या पतीसोबत असणाऱ्या एक आरोपीने या महिलेसोबत अश्लील वर्तन केले. या मारहाणीत महिला जखमी झाल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर या महिलेने पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदननगर पोलिस याचा तपास करत आहेत.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यात आता पतीनेच भर रस्त्यात पत्नीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही दिवसापूर्वी लोणी काळभोर परिसरात पत्नीला गर्भवती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला होता.