काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला म्हणून आम्ही आता…
काँग्रेसचा महाविकास आघाडीला इशारा, महाविकास आघाडी तुटली तर प्लॅन बी...
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. पण आता काँग्रेसने आघाडी न झाल्यास आमचा प्लॅन बी तयार असल्याचे सांगत महाविकास आघाडीलाच इशारा दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत कोणत्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. आता तो प्लॅन बी कोणता आणि तो का तयार करण्यात आला आहे यावर पटोले यांनी खुलासा केला आहे. नाना पटोले म्हणाले की, आतापर्यंत जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची लोकशाहीची परंपरा आहे. काँग्रेसच्या प्लॅन ‘बी’विषयी विचारल्यावर पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धोका मिळाला. त्यामुळे आम्ही सावध झालो आहोत. त्या धोक्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरणार आहेत. ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असणार आहे. परंतु आज काँग्रेस पक्ष म्हणून, पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की, माझा पक्ष प्रत्येक ठिकाणी उभा असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आणि मी ते करतोय अशी भुमिका नाना पटोले यांनी मांडली आहे. यावर नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर तिरकस शब्दात टिका केली आहे.
काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंवर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे, तसेच महाडची जागा काँग्रेस पक्षच लढवेल, असंही स्पष्टीकरण दिले आहे.