Just another WordPress site

सावधान! आपल्या घरातील मुली महिला सुरक्षित आहेत का?

राज्यात रोज ७० मुली होत आहेत बेपत्ता, धक्कादायक आकडेवारी समोर, आमिष दाखवून मुलींची दिशाभूल

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळजीत टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता झाल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील सुमारे ७० मुली दररोज बेपत्ता होत आहेत. मार्च महिन्यात राज्यातून २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १८१० इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत ३९० ने वाढ झाल्याचं स्पष्ट झाले आहे. तर मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त मुली बेपत्ता आहेत. त्यात पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगर येथील मुलींचा समावेश अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींच्या आकडेवारीचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. त्यांची नोंद अपहरणाच्या केसमध्ये केली जाते. तर १८ वर्षावरील मुली आणि महिला बेपत्ता झाल्यास, तशी तक्रार आल्यास पोलिसामध्ये त्याची नोंद केली जाते. प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान या संदर्भातला अहवाल राज्य शासनाला पाठवल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. त्यांनी गृह विभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे.

GIF Advt

महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केले आहे. राज्यातून मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्र हरवलेल्या महिलांच्या बाबतीत नंबर एकला आहे. आम्ही राज्य महिला आयोगाच्यावतीनं वारंवार पाठपुरावा करत आहोत. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांचा शोध घ्यावा. राज्यातील मिसींग सेलचा आढावा घेऊन सूचना द्याव्यात. असे सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!