Latest Marathi News
Ganesh J GIF

‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत न्याय झाला नव्हता’

गुनरत्न सदावर्तेचें वादग्रस्त वक्तव्य, गोडसेचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी ठेवल्याने वादंग?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केलं आहे.एकंदरीत आधीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी निलंबित वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदावर्तेंनी शरद पवारांवरही टिका केली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांनी आपले पॅनल उतरवले आहे. त्यावेळी त्यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना सदावर्तेंनी वादग्रस्त विधाने केली आहेत. सदावर्ते यांची ज्याठिकाणी पत्रकार परिषद झाली त्यावेळी तेथे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच नथुराम गोडसे यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला होता. सदावर्ते म्हणाले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासाक आहे. नथुराम गोडसे यांचा खटला चालला. त्यात नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानात पीएचडी केली तेव्हा लक्षात आलं की, गोडसेंच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ते माझ्या चळवळीत असतील. यावेळी सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे. शरद पवारांना धमकी दिली, आणि मागणी करायला कोण गेलं? तर त्यांची मुलगी. यांना कोण धमकी देणार? दाऊद इब्राहिम कोणाच्या काळात पळाला? असा सवाल त्यांनी विचारला. शरद पवारांच्या वैचारिक वायरसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेऊ. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरसचे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे गदारोळ होण्याची शक्यता आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही याचे अध्यक्षपद कष्टकऱ्यांना मिळू दिले नाही. या निवडणुकीत आमचं पॅनल लढणार असून त्यात विजयी होईल. शिंदे सरकार आले आणि पवारांच्या घरावरील हल्याच्या खोट्या गुन्ह्यात डांबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली असल्याचे म्हणत सदावर्ते यांनी शिंदे सरकारचे काैतुक केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!