‘तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा’
राष्ट्रवादीच्या 'वजनदार' माजी मंत्र्यांचे मुख्यमंत्री शिंदेना ओपन चॅलेंज
बीड दि १ (प्रतिनिधी) – राहमें खतरे कितने भी हो, लेकिन ठहेरता कौन है.. मौत कल आती है आज आजा ये, अरे डरता कौन है..तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा, मरता कौन है, असा सणसणीत शेर मारत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंडे विरूद्ध शिंदे सरकार असा सामना होणार आहे.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांना उद्देशून टीका केली होती धनंजयजी फडणवीसांनी तुम्हाला दया, क्षमा, ‘करुणा’ दाखवली पण ते दरवेळेस दाखवतील असे नाही अशी शेरेबाजी करत इशारा दिला होता. त्यावर आता मुंडे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ते म्हणाले, संघर्ष माझ्या पाचवीलाचं पूजलेला आहे, राजकीय, कोविड यासह अनेक संकटे माझ्यावर आली आहेत. मात्र, तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणून जगात मी कुणालाही भीत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशा-याला राहत इंदोरी यांचा शेर अर्ज करत प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी परळीकरांना साद घालताना माझ्या जिवात जीव म्हणून ज्या कुणामुळे येत होता तो फक्त या समोरच्या माझ्या मायबाप जनतेमुळे येत होता असे भावनिक आवाहन केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वतः नगरविकास मंत्री असताना घेतलेला प्रभाग रचनेचा निर्णय बदलला होता. त्यावरून धनंजय मुंडे यांनी शिंदेची तुम्ही एकनाथ आहात एैकनाथ होऊ नका असा टोला लगावला होता. त्यावेळी शिंदेनी मुंडेना करुणा धब्द उच्चारत इशारा दिला होता. त्याला आता मुंडेनी प्रत्युत्तर दिल आहे.