Latest Marathi News

मला माझ्या दिसण्यावरुन आणि रंगावरुन हिणवण्यात आले

अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, फिल्मी दुनियेबद्दल केले रोखठोक वक्तव्य, नेमके काय म्हणाली अभिनेत्री?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- रूपेरी पडद्यावर कोणाला झळकायच असेल तर काहीजण अभिनयापेक्षा रंगरूप पाहिले जाते. पण काहीजण अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. तर काहीजण केवळ नशीबाच्या बळावर पदार्पण करतात. असाच काहीसा आलेला अनुभव सांगितला आहे. तसेच आपल्याला रंगामुळे कसे डावलले होते. त्यामुळे कसा संघर्ष करावा लागला याचा लेखाजोखा मांडला आहे. सध्या तिच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, मालिकेतून ती सर्वप्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणि प्रसिद्ध झाली. हिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ रोजी श्रीनगरमध्ये झाला. त्यानंतर तिनं दिल्लीत शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच एका मुलाखतीत तिने आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला हवाई सुंदरी बनायचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे तिला पत्रकारिता क्षेत्रातही आवड होती. काही कारणास्तव ते स्वप्नही अपूर्ण राहिले. पण नंतर तिने मुंबईतील एका मैत्रीणीसोबत सहजच ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेची आॅडीशन दिली. आणि विशेष म्हणजे मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली. यावेळी तिने तिला आलेले अनुभवाबद्दल सांगितले की, मला सुरूवातीला दिसण्यावरुन आणि रंगावरुन पहिल्यांदा काम मिळणे कठीण झाले होते. एका प्रोजेक्टमध्ये तिला कश्मिरी मुलीची भूमिका करायची होती मात्र तिला ती कश्मिरी मुलीसारखी दिसत नाही म्हणून नाकारले होते. पण सध्या तिचा वेगळा चाहता वर्ग असून ती नेहमीच चर्चेत असते. हिना रॉकी जयस्वाल याला गेल्या १४ वर्षांपासून डेट करत असल्याची चर्चा आहे. पण अद्याप त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हिना खान ही नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. ती ‘खतरों के खिलाडी ८’च्या पर्वात दिसली होती. तसंच त्यानंतर तिनं ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेतही भूमिका केली. यानंतर ती बिग बॉसच्या ११ व्या सीझनमध्ये दिसली होती. सध्या ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!