Latest Marathi News

‘हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावला तर’

पोलिसांना धमकी देणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल, पंतप्रधान मोदींनाही ओढले वादात, बंदूक दाखवत म्हणाली....

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ उर्मटपणाचे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेने पोलीसांसोबत अरेरावी करत शिविगाळ केली आहे. इतकेच नाहीतर उडवून देण्याची धमकी देत त्या महिलेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या वादात ओढले आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून, अनेकांनी महिलेच्या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे.

मुंबईतील वांद्रे वरळी सी -लिंकवर दुचाकीला परवानगी नाही. तरीही एक महिला दुचाकीने त्यावर आली. त्यावेळी पोलिसाने त्या महिलेला अडवले असता. त्या महिलेने पोलीसालाच धमकावायला सुरुवात केली. एवढेच नाही तर तिने त्यांना मारण्याचीही धमकी दिली. व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला सी लिंकवर दुचाकीने जात होती. त्यावेळी तिला पोलीसांनी अडवले. त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. एवढेच नाहीतर तिने पोलिसांना अश्लील अपशब्द वापरले. पोलीसांनी तिच्या गाडीला हात लावला असता हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत कशी झाली अशी धमकी दिली.कहर म्हणजे तिने या वादात मोदींनाही खेचले. आपण गाडी तेंव्हाच बंद करू जेंव्हा मोदी आपल्याला गाडी बंद करायला सांगतिल, असे देखील ती महिला म्हणताना दिसत आहे. तसेच आपली गाडी थेट स्टाॅक मार्केटजवळच थांबेल असेही ती म्हणताना दिसत आहे. यावेळी महिलेने बंदूक काढत थेट पोलीसांनी उडवण्याची धमकी दिली. पण तिच्याकडे असलेली गन खरीखुरी गन नसून टॉयगन असल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी महिलेवर कारवाईची मागणी केली आहे.

वाद घालणारी महिलेचे नाव नुपूर पटेल असून ती मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे. तिची बुलेट तेथील एका रिअल इस्टेटच्या नावावर नोंद आहे. महिलेला कलम 41A अंतर्गत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. यानंतरच तिला जाण्याची परवानगी देण्यात आली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!