Latest Marathi News
Ganesh J GIF

आज निवडणुका झाल्या तर देशात या पक्षाची येणार सत्ता?

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर देशातील राजकीय समीकरणे बदलणार, महाराष्ट्रात कोणला मिळणार सर्वाधिक जागा?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राज्यात लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता एक नवा सर्व्हे समोर आला आहे. त्यामध्ये आता निवडणूका झाल्या तर कोणत्या पक्षाची सत्ता येणार याची आकडेवारी दिली आहे.

लोकसभा निवडणूकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वजण तयारीला लागले आहेत. भाजपा आपल्या विजयाची हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहे. तर सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठीची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीनंतर टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या सर्व्हेत कोणाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार भाजप विजयाची हॅट्रीक करणार असून भाजपा आणि मित्रपक्षाच्या मिळून २८५ ते ३२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपा आपला २०१९ चा आकडा राखण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला १११ ते १४९ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस २०१४ नंतर पहिल्यांदाच १०० चा आकडा पार करणार आहे. कारण सध्या देशात काँग्रेसचे ५२ खासदार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. जर आज निवडणुका झाल्या तर भाजपला २२ ते २८ जागा मिळतील. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा गट मिळून महाविकास आघाडीला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही मध्ये मतांची टक्केवारी देखील जवळपास सारखीच राहण्याची शक्यता आहे.

नव्या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागा दुप्पट होणार असल्या तरीही भाजपा आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. पाहूया कोणाला किती जागा मिळतील

भाजप आणि मित्र पक्ष- २८५ ते ३२५
काँग्रेस- १११ ते १४९
वायएसआर काँग्रेस- २४ ते २५
तृणमूल काँग्रेस- २० ते २२
बीजेडी- १२ ते १४
बीआरएस- ९ ते ११
आम आदमी पक्ष- ४ ते ७
समाजवादी पक्ष- ४ ते ८
अन्य- १८ ते ३८

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!