Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू

सत्ताधारी पक्षातील आमदाराचा शिंदे सरकारला इशारा, आपल्याच आमदारामुळे सरकार अडचणीत, एकनाथ शिंदे बॅकफुटवर?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच वाढली आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक नेत्यांना जाहीर जाब विचारला जात आहे. आता तर गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृत्ती खालावली असल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. तसेच दोन दिवसात निर्णय न घेतल्यास मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. पण आता सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारला इशारा दिला आहे.

राज्याचं हिवाळी अधिनेशन नागपुर येथे ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दहा दिवसात अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला कडक इशारा दिला आहे. आरक्षण मिळाले नाही तर सर्व मराठा समाजाच्या आमदारांना सोबत घेऊन संसदेचे हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके हे सध्या सत्तेत आहेत. तरीही सर्व मराठा समाजाच्या आमदारांना सोबत घेऊन संसदेचे हिवाळी अधिवेशन बंद पाडू असे निलेश लंके म्हणाले आहेत. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मात्र आमदार निलेश लंके जेव्हा कार्ला इथल्या उपोषणस्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी रोखण्यात आलं नाही. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांशी संवाद साधला. दुसरीकडे कालच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार देखील आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बारामती मतदार संघात नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला होता. पण आता अजित पवार गटाचे आमदारच आक्रमक झाल्याने अजित पवार गटाने आपली भूमिका बदलल्याची चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!