Latest Marathi News
Ganesh J GIF

 ‘काम मिळेना वाटतं आंटीला…’ म्हणत ही अभिनेत्री ट्रोल

ट्रोलर्सला अभिनेत्रीने सुनावले, अभिनेत्रीच्या उत्तराची जोरदार चर्चा, नेमके काय घडले, हा व्हिडिओ कारण

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर हिला देखील जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण अमृताने यावेळी त्या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

अमृता सध्या तिच्या नव्या ट्रॅव्हल सीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या याच शोच्या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. अमृताने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं. सध्या युट्यूब चॅनेलवर अमृताने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ ही नवीन सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री राज्यातील नवनवीन ठिकाणांना भेट देत असते. यात ती महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि आपल्याकडील निसर्गरम्य जागांचं महत्त्व जगभरातील पर्यटकांना सांगत आहे. या सीरिजचे आतापर्यंत एकूण ५ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. या सीरिजमधील पुण्याच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत अमृताला ट्रोल केले होते. एका नेटकऱ्याने अमृताच्या या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की, “काम मिळेना वाटतं आंटीला…”. या कमेंटवर प्रत्युत्तर देत अमृताने नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं. अमृता म्हणाली, “अहो आजोबा हे कामच आहे. हा प्रवासाशी संबंधित असणारा एक कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदीची कल्पना नसेल. हरकत नाही.” असे म्हणत तिने ट्रोलर्सला सुनावले आहे. दरम्यान अनेक कलाकारांना आजवर अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

अमृताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी सिनेसृष्टीसह तिने बॉलिवूडमध्येही तिचं नाव कमावलं. अमृताचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट तर प्रचंड गाजला होता. याचबरोबर चोरीचा मामला’ या मराठी चित्रपटांसह तिने ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘फूंक’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!