मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वराज्य संस्थेतील निवडणुकांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांबाबत रणनीती ठरवण्यस आली. येत्या निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहेत.त्याचप्रमाणे शिंदे गट आणि भाजप हे सुद्धा युती करुन लढणार आहेत. त्यामुळे युती विरूद्ध महाविकास आघाडी अशी तगडी लढत पहायला मिळणार आहे.भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी केला असून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढल्यास भाजपाला बळ मिळेल. त्यामुळे भाजपाला सत्तेतून बाहेर फेकायचं असेल तर महाविकास आघाडीने एकत्र लढणं गरजेचं असल्याचं सिद्ध झालं आहे. तसेच, महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपाला धोका आहे, असं भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. स्थानिक स्तरावरील माहितीच्या आधारे या निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.पण मुंबई महापालिका राखण्यासाठी शिवसेना आघाडीत लढण्यास उत्सुक आहे.