Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या आमदारासमोर लग्नमंडपातही ‘पन्नास खोकेच्या घोषणा

आमदार संतोष बांगर यांच्यावर खजील होण्याची वेळ, घोषणेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, काय घडले

परभणी दि १(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलेल्या त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होणार आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘पन्नास खोके एकदम ओके’ ची घोषणाबाजी अजूनही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. शिंदे गटाचे खासदार आमदार जिथे जातात तिथे त्यांना त्या घोषणेचा सामना करावा लागतो.आता शिंदे गटाचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांना देखील घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे.

संतोष बांगर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे. या प्रकारा संबंधित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला संतोष बांगर यांनी हजेरी लावली होती. यावेळी, लग्न मंडपात पहिल्यापासून उपस्थित असलेले परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचा बांगर यांनी चरण स्पर्श केला. त्यावेळी ‘बॉस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून`पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळासाठी तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते. त्यामुळे बांगर यांचा चेहरा पुरता पडला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी कार्यक्रमातून तातडीने काढता पाय घेतला. बांगर शिंदे गटात गेल्यापासून वादात सापडत आलेले आहेत. बाजार समिती निवडणूकीत जर आपण पराभूत झालो तर मिशी काढू अशी घोषणा केली होती. पण ते पराभूत झाल्याने बांगर मिशी काढा अशी जोरदार टोलेबाजी केली जात आहे. दरम्यान यानंतर लग्नातील नातेवाईकांना त्यांना घोषणाबाजी न करण्याबाबत समजावले. यानंतर वातावरण शांत झाले.

 

यापूर्वी उदय सामंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक आमदारांसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिलेल्या आहेत. बच्चू कडू यांनी याबद्दल खंत देखील व्यक्त केली होती. परंतु संतोच बांगर यांच्यासमोर घोषणाबाजी केल्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!