Latest Marathi News
Ganesh J GIF

जय पवारला मरीन ड्राईव्हवरून कोणत्या हालतमध्ये घरी सोडलं

रणजित कासलेचा अजित पवार यांना सुचक इशारा, फोटो पुरावे असल्याचा केला दावा, व्हिडीओने खळबळ

बीड – महाराष्ट्राचे राजकारण सध्या बीडभोवती फिरत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. त्यातच आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट अजित पवार यांच्यावरच निशाना साधला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. मात्र येथे त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. कराडला बीडच्या कारागृहात स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर तो २५ हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. कासले म्हणाला, ‘मी बीडच्या तुरुंगात गेलो तर पाहिले की खास कपात वाल्मिक कराडला चहा दिला जातो. बाकीच्यांना प्लास्टिकचे कप आहेत. वाल्मिक कराडला पांघरण्यासाठी सहा ब्लँकेट दिले आहेत. त्या ब्लँकेटी गादी करून तो त्यावर आराम करतो. रोज त्याला वाचण्यासाठी सहा सहा पेपर आहेत. खायला चिकन मिळते. वाल्मिक कराडसाठी बीड जेलमध्ये स्वर्ग आहे.’ असे सांगताना स्टंटबाजी करायची असती तर वाल्मिक कराडचं एनकाउंटर केलं असतं, मला पन्नास करोड मिळाले असते, असं देखील त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. त्याचबरोबर कासले यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. कासले म्हणाले अजित पवार माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी माझ्याकडे आहे. प्रिंटमध्ये-फोटोमध्ये आहे. गरज लागली की एक-एक पत्ता ठेवायचा, सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही, असं सूचक वक्तव्य सुद्धा रणजित कासले यांनी केले आहे. जय पवार यांना मरीन ड्राईव्हवरून कोणत्या हालतमध्ये घरी सोडलं होतं, याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे, असा इशारा त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

 

रणजित कासले याला साबयर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्याच्यावर बडतर्फीची देखील कारवाई करण्यात आली. त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला असून त्यानंतर त्याने शनिवारी त्याने व्हिडिओ शेअर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!