या फेमस अभिनेत्रीवर आयकर विभागाची कारवाई
करचुकवेगिरी केल्याचा आरोप, याही सोशल मिडीया स्टारवर कारवाई, धाबे दणाणले
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- प्राप्तिकर विभागाने केरळमधील अभिनेत्री पर्ल मानेसह १३ प्रमुख यु ट्युबर्सच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. एर्नाकुलम, पठाणमथिट्टा, त्रिशूर, अलप्पुझा, कोट्टायम आणि कासारगोड या विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले.
यूट्यूबर्सवर करचुकवेगिरीचा आरोप करणाऱ्या तक्रारी आल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर हे मोठे छापे टाकण्यात आले होते. केरळमध्ये लोकप्रिय व्लॉगर्स व्हिडिओ प्लॅटफॉर्मद्वारे वर्षाला १ ते २ कोटींची कमाई करत असल्याची माहिती आयटी विभागाला मिळाली होती. पियरले माने केरळमधील लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक आहे. टीव्ही होस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी पियरले डान्स फाॅर डान्स या शोमधून घराघरात पोहोचली होती. येत्या काही दिवसांत राज्यातील आणखी युट्युबर्सवर आणखी छापे टाकण्यात येणार आहेत. यु ट्युबरना यु ट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळणारे वेतन त्यांच्या व्हिव्जवर अवलंबून असते. त्यामुळे कर भरण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सोशल मिडीया स्टारचे धाबे दणाणले आहेत.
यूट्यूब चैनल आणि सब्सक्राइबर
एम4टेक: ११.२ मिलियन
अनबॉक्सिंग ड्यूड: ३.७५ मिलियन
अर्ज्यौ: ३.६१ मिलियन
मछली पकड़ने के शौकीन: ३.३५ मिलियन
अखिल एनआरडी: २.८३ मिलियन
पियरले माने: २.६ मिलियन
जयराज जी नाथ: १.७२ मिलियन