फेसबुक लाईव्ह करत विवाहित महिलेची आत्महत्या
पतीचे अनैतिक संबंध असल्याचा केला आरोप, प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट
हैद्राबाद दि २४(प्रतिनिधी)- हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या आई-वडिलांच्या घरी नाताराम येथे छतावरील पंख्याला दोरी बांधून आपले तिने जीवन संपवले. यावेळी तिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येआधी तरूणीने फेसबुक लाईव्ह करत आपली कहानी सांगितली होती.
सना असं या महिलेचं नाव असून ती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. तिने पती हेमंत पटेल याच्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे फेसबुक लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. सनाचा हेमंतबरोबर पाच वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. हैदराबादच्या हायटेक सिटीमध्ये सना काम करायची. लग्नानंतर दोघेही दिल्लीला गेले होते. कोरोनाच्या काळात जेव्हा ती परत आली तेव्हा आपल्या पतीचे बाहेर अफेअर असल्याचं तिला समजले. पण त्यावेळी ती गरोदर असल्याने शांत होती. पण नंतर एक दिवस सनाने त्याचे अफेअर रंगेहात पकडले होते. त्यानंतर मात्र त्याने तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून सनाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. सनाने फेसबुक लाईव्हमध्ये पती हेमंतवर आरोप केले आहेत. तसेच, तिच्या ३ वर्षीय मुलाचा ताबा हेमंतकडे न देता तिच्या आई वडिलांकडे देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सनाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्ष सर्वकाही सुरळीत चालले, परंतु त्यानंतर हेमंतने सनाला त्रास देण्यास सुरुवात केली.
सनाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिचा मोबाईल जप्त केला. सनाच्या फोनवर सापडलेल्या हेमंत आणि सोफी खानसोबतच्या चॅटचा तपास पोलीस करत आहेत. सनाच्या कुटुंबीयांनी केलेल्या फिर्यादीवरुन हेमंत पटेल आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.