वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा
कोणाला धक्का, तर कोणाला मिळाली संधी, अनुभवी खेळाडूंना डच्चू, या तारखेपासून दाैऱ्याला सुरुवात
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आगामी जुलै महिन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. उपकर्णधारपदी मराठमोठ्या खेळाडूल संधी मिळाली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आले आहे. तर कर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे. ऋतुराज गायकवाडचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वाल देखील संघाचा एक भाग आहे. मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि ईशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. भरतला देखील संघात स्थान देण्यात आलेले आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माला विश्रांती दिली जाणार असल्याचे म्हटले जात होते. बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतरही बीसीसीआयनं रोहित शर्मावर विश्वास दाखवला आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादवच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज मोहम्मद शमीला संपूर्ण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. नवदीप सैनीला कसोटी संघात संधी मिळाली आहे.
कसोटी संघ:
रोहित शर्मा (C), अजिंक्य रहाणे (VC), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (WC), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (WC), इशान किशन (WC), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
येत्या १२ जुलैपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.