भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेत्री पत्नीचा होणार घटस्फोट?
क्रिकेटपटूच्या पोस्टने चर्चांना उधान, चार वर्षाचा संसार मोडणार?, हे आहे कारण?
मुंबई – भारतीय क्रिकेटपटू हार्दीक पाड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा काही दिवसांआधी घटस्फोट झाला होता. आता हार्दीकनंतर भारतीय संघातील आणखी एक क्रिकेटपटूचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
युझवेंद्र याने २२ डिसेंबर २०२० रोजी धनश्री वर्मासोबत लग्न केले होते. गेल्या २२ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली. लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्न केले होते. यावेळी त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ते इन्स्टाग्रामवर एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाहीत. त्यांनी कोणताही फोटो पोस्ट केला नाही किंवा प्रेम व्यक्त केले नाही. यामुळे चाहत्यांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. दोघांमध्ये काही तरी बिनसलं असून ते वेगळे होणार आहेत अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान याने ट्वीट करत ‘ज्या दिवशी चहल आणि धनश्री यांचं लग्न झालं तेव्हाच मी त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोललो होतो. आणि आता खरंच ते वेगळे झालेत. चहल कसा आहे दिसायला आणि ती एवढी सुंदर. त्यामुळे चहल तिच्याशी लग्न करून १०० टक्के चुकलाय.’ असे खान म्हणाला आहे. त्याच्या या पोस्टवर चहल आणि धनश्री यांच्या कोणत्याही प्रतिक्रिया अजून आलेल्या नाहीत. मात्र यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एका डिनर दरम्यान धनश्री आणि श्रेयस अय्यर एकत्र डान्स करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्यात भांडण झाल्याची चर्चा रंगली होती. धनश्री आणि श्रेयस एकमेकांना डेट करत असल्याचं देखील बोलले जात आहे. दरम्यान चहलची पत्नी धनश्री अनेकदा लोकांसोबत डान्स करताना दिसते. ती व्यवसायाने मॉडेल आणि कोरिओग्राफर आहे. याआधीही चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाबाबत अनेकदा अफवा पसरवण्यात आल्या आहेत. पण आता चहलचे नव्याने सुरुवात करण्याच्या पोस्ट आणि १४ नोव्हेंबरनंतर युजवेंद्र चहलने धनश्री वर्माच्या कुठल्याही पोस्टला लाइक अथवा त्यावर कमेंट केलेली नाही. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा जोरदारपणे रंगली आहे.
चहलची पत्नीही धनश्री अनेक ब्रँडच्या जाहिराती करताना दिसत आहे. तिचा तेलुगु चित्रपटही लवकरच येत आहे. धनश्री वर्मा तिच्या आगामी सिनेमासाठी खूप मेहनत घेत आहे.