
भारताच्या स्टार क्रिकेटपटूची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
धक्कादायक निर्णयामुळे चाहत्यांना धक्का, म्हणाला खेळ बाकी आहे...
मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील ऑफस्पिनर आर आश्विन याने आंतरराष्ट्री क्रिकेट आणि या खेळातील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय कर्णधार रहित शर्मा याच्यासोबत ब्रिस्बेन मधील गब्बा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्याने आज हा निर्णय जाहीर केला. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे.
आर आश्विन याने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मला असे वाटते की क्रिकेटपटूमध्ये माझ्यामध्ये आणखी थोडा खेळ बाकी आहे. जो मी क्लब-स्तरीय क्रिकेटमध्ये दाखवू इच्छितो. त्यामुळे हा माझा शेवटचा दिवस असेल. दरम्यान या दौऱ्यात आश्विनला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला होता. अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आश्विनने डिसेंबर २०११ ला विंडिजविरूद्ध पदार्पण केले होते. आर. अश्विन याने एकूण २८७ सामने खेळले आहेत. यामधील त्याने १०६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५३७ विकेट घेतल्या आहेत. ११६ वन डे सामन्यांमध्ये त्याने १५६ विकेट्स तर ६५ टी-२० सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या. अश्विनने ३ हजार ५०३ धावा केल्या असून त्यामध्ये ६ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
आर. अश्विननं निवृत्ती जाहीर केली. ही घोषणा करण्यापूर्वी टीम इंडियानं अश्विनला गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी त्यानं सहकाऱ्यांनी दिलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. आर. अश्विन यानं वयाच्या 38 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.