Just another WordPress site

जेएसपीएम काॅलेजमध्ये मुलीवरील अत्याचार घटनेचा सीआयडीमार्फत तपास करा

उपसभापती डाॅ नीलम गोर्हे यांचे निवेदन,मुलीला सुरक्षा देण्याची मागणी

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापतीची डाॅ निलम गोर्हे यांनी निषेध करत मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट आहे.तत्पूर्वी निलम गोर्हे यांनी निवेदन प्रसिद्ध करत मुलीवर अत्याचार प्रकरणी निषेध नोंदवला आहे. दिलेल्या निवेदनात जेएसपीएम इन्स्टिट्यूट फार्मसी महाविद्यालय हडपसर येथील होस्टेलमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी. तसेच पीडीत तरुणीवर कोणताही राजकीय किंवा आर्थिक दबाव येत असल्यास त्याची चौकशी सीआयडीकडे देण्यात यावी,त्याचबरोबर पीडित महिलेला योग्य न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून समुपदेशन आणि संरक्षण देण्यात यावे. आणि आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन डीसीपी नम्रता पाटील यांना शिवसेना उपशहर संघटिका प्रा. विद्या होडे यांनी दिले आहे.याप्रसंगी शादाब मुलांनी युवा सेना समन्वयक व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

GIF Advt

खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या शिक्षण संस्थेत असा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून घटनेला चार दिवस उलटूनही आरोपीचा शोध सुरु आहे.त्यामुळे निलम गोर्हे यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!