Just another WordPress site

‘या’ अभिनेत्रीच्या रॅम्पवाॅकवर चाहत्यांच्या खूपच हटके कमेंट

चित्रपटात काम न करताही ही अभिनेत्री लोकप्रिय हा व्हिडिओ बघाच

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सुंदरतेला वयाचे बंधन.नसते असे म्हणतात, म्हणूनच वयाच्या ४८ व्या वर्षी देखील हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणारी अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरीही ती कायम चर्चेत असते.पण या ग्लॅमरस मलायकाचा एक रॅम्प वाॅक केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत.

GIF Advt

मलायकाचा रॅम्प वाॅक काहींना आवडला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. मलायकाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक या शोमध्ये मलायका रॅम्प वाॅक करताना दिसली.मलायकाच्या लूकवर अनेकांनी कमेंट केली आहे. काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ‘म्हातारी’ म्हणून हिनवले तर काहींनी  ‘मॅडम चालताना सांभाळा नाहीतर पडद्यामुळे तुम्ही पडाल’ असा काळजीचा सल्ला दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर एकाने ‘या वयातदेखील तुम्ही हा शो करत आहात याबद्दल कौतुक केले पाहिजे’ असे लिहिले आहे तर एकाने बोल्ड दिसत आहात अशी कमेंट केली आहे.

 

अभिनेत्री मलायका अरोराला बॉलिवूडची फॅशन दिवाही म्हटले जाते. तिची लोकप्रियताही भरपूर आहे. यामुळेच मलायका इंस्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असतो. मलायका अरोरा चित्रपटात काम करत नसतानाही तिची पॉप्युलॅरीटी जबरदस्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!