ठाणे दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजप अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळत नसल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची मोट बांधली होती.पण भाजपाने उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेंव्हा शिंदे यांनी हा दावा केला आहे. शिंदे म्हणाले की, “२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या दाव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो, तोच मुख्यमंत्री होणार का? एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा थेट सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
सत्तेत समसमान वाटा म्हणजेच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि निम्मी मंत्रिपदं शिवसेनेला देण्यात यावी, असा फॉर्म्युला लोकसभेपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. पण शिंदेच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.