Latest Marathi News
Ganesh J GIF

विनायक मेटेंसोबत घातपात झाला असेल….

भाजपाच्या 'या'मंत्र्याचे मोठे विधान

कोल्हापूर दि १५ (प्रतिनिधी)- शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं. पण त्यांचा हा अपघात घातपात असल्याचा संशय मेटे समर्थकांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील त्यांच्या अपघाताच्या चाैकशीचे आदेश दिले आहेत. पण आता नवनियुक्त उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मेटे यांच्या अपघातावर शंका व्यक्त करताना मोठ विधान केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांसोबत संवाद साधला. विनायक मेटे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘विनायक मेटे यांच्यासोबत घातपात झाला असेल, तर त्याच्या मुळापर्यंत मुख्यमंत्री जातील. घटनेची सविस्तर चौकशी होईल, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. आताच मला असंही कळालं आहे की, या अपघाताला जबाबदार असलेला ट्रक हा गुजरातमधील सुरत येथे सापडला आहे. आता ट्रक सापडला, त्यामुळे चालकही सापडेल. मग या घटनेची चौकशीही होईल. याक्षणी संबंधित घटनेबाबत मी मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण हा जर घातपात असेल तर मुख्यमंत्री त्याच्या मुळापर्यंत जातील’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील काहीतरी वाईट घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे मेटेञचा अपघात की घातपात या बद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!