Latest Marathi News
Ganesh J GIF

मतदान करतानाचा फोटो काढणे तरुणास पडले महागात ; तरुणास अटक

मतदानाच्या ठिकाणी मतदारांना मोबाइल सोबत नेण्यास बंदी असताना एका तरुणाने मोबाईल बेकायदेशीरपणे मतदान केंद्रात घेऊन जाऊन मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरलं केला. याप्रकरणी तरुणास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे .

मार्टिन जयराज स्वामी (वय २५) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत निवडणुक मतदान केंद्राधिकारी नरेंद्र देशमुख (वय ५४) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य करीत होते. यावेळी आरोपीने स्वत:चे मतदान करताना, बॅलेट युनिट व व्ही व्ही पी ए टी यांचे फोटो काढल्याचे व बॅलेट युनिटवरील अं. क्रमांक १ वरील तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीवर बटण दाबून मत टाकल्याचा व तशी स्लिप व्ही व्ही पॅटमध्ये दिसून आली. हा फोटो व व्हिडिओ त्याने स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट वर स्टोरी ठेवून प्रसारित केले. हे करताना त्यान मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला व निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चेवले तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!