Latest Marathi News
Ganesh J GIF

ही आघाडीची अभिनेत्री लवकरच राजकारणात प्रवेश करणार?

आमदारकीची निवडणुक लढणार, पक्षही ठरला, चाहते उत्सुक, मात्र काहींचा विरोध, अभिनेत्री म्हणाली...

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड होय. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. पण आता ही अभिनेत्री लवकरच राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण तिने तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत.

प्राजक्ता गायकवाडने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  तिने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याला भेट दिली. यावेळी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिले. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर ग्रेट भेट”, असे कॅप्शन प्राजक्ता गायकवाडने या फोटोला दिले आहे. तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी “भावी आमदार” असे म्हटले आहे. त्यातील एका कमेंटवर प्राजक्ताने हसण्याचा इमोजी पोस्ट करत रिप्लाय केला आहे. तर काहींनी तिला “ताई राजकारणात जावू नका”, असा सल्ला दिला आहे. तर काहींनी गद्दारांच्या गोटात जाऊन चुकी केलात.असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर प्राजक्ता गायकवाड राजकाराणात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आता प्राजक्ता यावर काय उत्तर देते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तसेच ती वारीत देखील सहभागी झाली होती. यावेळी तिनं आजीबाईंसोबत फुगडी धरली. सोशल मीडियावर प्राजक्तानं हा व्हिडिओ शेअर केला होता. याबद्दल तिचे अनेकांनी काैतुक देखील केले होते.

प्राजक्ता सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. उत्तम अभिनय आणि साधेपणा यामुळे प्राजक्ता आज चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!