
सांगली दि ५ (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडीतील यशोदा आकाश शिंदे हिचा घातपात करून जीवे मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरसुंडी येथील एका गावातील यशोदा इंगवले व आकाश शिंदे यांचा विवाह एका वर्षांपूर्वी झाला होता. पण वर्षभरात यशोदाला जगाचा निरोप घ्यावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार आकाशला दारूचे व्यसन होते. तो नेहमी यशोदाला मारहाण आषि शिवीगाळ करायचा. सर्व नातेवाईकांनी आकाशला समजावून सांगितले होते. मात्र तो सुधरण्याचे नाव घेत नव्हता. काही दिवसानी आकाशने कामासाठी मुबंईला जात असल्याचे सांगत यशोदाला सोबत नेले होते. तेथेही तो यशोदाला मारहाण करत असल्याने ती माहेरी खरसुंडीला आली होती. नंतर आकाशही खरसुंडीला आला. आकाशने अनेकवेळा यशोदाला सासरी नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आकाश दारूच्या आहारी गेला असल्याने यशोदाच्या नातेवाईकांनी तिला सासरी पाठवले नकार दिला. मात्र, आकाश सतत यशोदाला सासरी बोलावत होता. मागील चार पाच दिवसांपूर्वीच त्यानर आजी आजारी असल्याचे सांगत यशोदाला घरी घेऊन आला होता.घटनेच्या दिवशी यशोदाच्या नातेवाईकाला गावातील एकाने यशोदाने गळफास घेतल्याचे सांगितल्याने विक्रमने तत्काळ आकाशच्या घरी धाव घेत पाहिले असता आकाश यशोदाच्या तोंडावर पाणी मारत होता व तिला फिट आल्याचे सांगत होता. पण यशोदाला खरसुंडी व भिवघाट येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नातेवाईकांनी आकाशनेच यशोदाचा खून केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. आकाश यशोदाकडे दारूसाठी पैसे मागत असल्यानेच तिचा पती आकाश आनंदा शिंदे, सासू मंगल आनंदा शिंदे व नणंद ज्योती प्रदीप इंगवले यांनी यशोदाला मारल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.