वाहून चाललेल्या तरुणाला वाचवायला गेला आणि…..
नागपूरमधील पूर आलेल्या नदीतील 'तो' थरारक व्हिडिओ व्हायरल
नागपूर दि ५ (प्रतिनिधी) – राज्यात अनेक ठिकणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.पण नागपूर मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.हे पाहुणे अनेकांचा थरकाप उडाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला आहे. संजय नागपूरे असे त्या व्यक्तीचं नाव आहे. हा तरुण पुलावरुन पायी निघाला होता. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो प्रवाहासोबत वाहून चालला होता. संजयला वाचवण्यासाठी एक तरुण मदतीला धावला. संजयला वाचवण्यासाठी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दोघेही वाहून जाऊ लागतात. यानंतर मदतीसाठी गेलेला तरुण संजयचा हात सोडून स्वतःचा जीव वाचवला.त्याला पोहता येत असल्याने त्याने आपला जीव वाचवला. मात्र, संजयला वाचवण्यात तो अपयशी ठरला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. सध्या संजयचा कोणताही पत्ता नसून स्थानिक आपल्या स्तरावर त्याचा शोध घेत आहेत.