Latest Marathi News
Ganesh J GIF

जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात सामील होणार?

अजित पवार पुन्हा शरद पवार यांना धक्का देणार, पक्षावरील दावा मजबूत करणार, मंत्रिपदाचा प्रस्ताव?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर आता अजित पवार गटाने जयंत पाटील यांना आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते. पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही.शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. नगरमधील आमदार घुले हे जयंत पाटील यांचे व्याही आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार कामाला लागले आहेत. खरेतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कायम छुपा संघर्ष राहिला आहे. पण त्यातच अजित पवार यांना आपल्याकडे वळवण्यासाठी का प्रयत्न करत आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत त्यात राजेंद्र शिंगणे मकरंद पाटील किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशातून परतल्यानंतर थेट अजित पवार यांच्या गटात सामील झाले.

जयंत पाटील यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी आदरणीय शरद पवार यांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत. आमच्यातील कोणीही त्यांच्या संपर्कात नाही. अफवा पसरविणार्‍यांबद्दल आम्ही काय बोलणार, असे पाटील म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!