केसीआर यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला
आगामी विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची केसीआर यांची घोषणा, मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव पण....
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. अनेक माजी आमदार, खासदारांना पक्षात घेत त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. त्यातच आता पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत विधानसभेची तयारी केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा केसीआर यांनी आधीच केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत पक्षाने आघाडी घेतली आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे या पक्षात आल्यातर त्यांना मुख्यमंत्री पद दिले जाईल असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पण तशी शक्यता दिसत नसल्यामुळे आता पक्षाने थेट शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. शेट्टी यांनी तसा दावा केला आहे. राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी यांनी सांगितले की, के. चंद्रशेखर राव हे आमचे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. बीआरएस पक्षाकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे राज्य असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुम्हाला पुढे करू, तुम्ही आमच्या पक्षात या. केंद्रीय कोअर कमिटीच्या बोर्डाचे सदस्यत्व तुम्हाला देऊ, असा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवण्यात आला होता. पण मला कोणत्याही पक्षात जायचे नसल्याने मी त्यांचा प्रस्ताव नाकारला. कारण, मला पक्षीय राजकारण करायचे असते तर ते याआधीच केले असते. आमची यापूर्वी फसवणूक झाल्यानं मी केसीआर यांनी नकार दिला” असे राजू शेट्टी यांनी सांगितले. केसीआर यांनी पंढरपूरात आपले पूर्ण मंत्रिमंडळ आणत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे.
राजू शेट्टी यांनी यावेळी केसीआर आणि मोदींवर निशाना साधला. अबकी बार किसान सरकार, असे तुम्ही म्हणताय, मग एवढा पैसा तुमच्यकडे आला तरी कुठून ? असा सवाल विचारला. तर दुसरीकडे दहा वर्षांपूर्वी सबका साथ सबका विकास म्हणत गुजरात मॉडेल समोर आणले आणि आमची फसवणूक केली. सबका साथ, सबका विकास तर सोडाच, उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असा आरोप केला आहे.