पुणे दि १६(प्रतिनिधी)- पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारून देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. आता पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.तर एका लग्नात देखील राडा घालण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरीकावर काही तरुणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरत ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सतीश काळे जखमी झाले आहेत.काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी हा हल्ला केला होता. तर दुसऱ्या एका घटनेत लग्नाच्या वरातीत नाचताना अचानक किरकोळ कारणावरून एका तरुणाला चार जणांनी कोयता, हॉकीस्टीक, बांबूचा वापर करत जबर मारहाण केली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील ही घटना घडली आहे.
अमरदिप जाधव याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तर जेष्ठ नागरिकाला झालेल्या मारहाणीचा शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.
पुण्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू आहे. पोलिसांनी कारवाई करूनही त्यांचे वारंवार हल्ले सुरूच आहेत. मोक्का सारखी कारवाई करूनही त्यांचा हैदोस सुरूच आहे. पुण्यातले दहशतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. काल पुण्यात कोयता गँगबरोबरच पालघन गँग देखील सक्रिय झाली आहे. त्यांन रोखण्याचे आव्हान पोलीसंमोर असणार आहे.