Latest Marathi News

रस्त्यावरील तरुणीला भरधाव जीपने उडवले

दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती, चालक फरार, घटना सीसीटीव्हीत कैद

चंदीगड दि १७(प्रतिनिधी)- रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला भरधाव वेगात असलेल्या जीपने उडवल्याची घटना घडली आहे. हिट अँड रनची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. चंदिगढमधील सेक्टर ५३ येथील फर्निचर मार्केटजवळ ही घटना घडली होती. यात तरूणीला गंभीर दुखापत झाली आहे.

तेजश्विता कौशल असे त्या तरूणीचे नाव आहे.तेजश्विता आणि तिची आई दररोज रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी जात असतात. घटनेच्या दिवशीही ती तरूणी रस्त्यावर कुत्र्यांना खाऊ घालत असताना थार जीपने जोराची धडक दिली.मुलीची किंकाळी ऐकून आई धावत तिथे गेली, मात्र तोपर्यंत जीप चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. आईने रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांकडे मदतीची याचना केली, मात्र कोणीही थांबलं नाही. अखेर आईने पती आणि पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर सरकारी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची ही घटना मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून, अज्ञात जीप चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दिल्लीतील तरुणीला कारने फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!