Latest Marathi News
Ganesh J GIF

कृष्णा आंधळे कर्नाटक सीमेवर तृतीयपंथीयांच्या वेशात?

बनला तृतीयपंथी? दाव्याने खळबळ

सोलापूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्याच्या फरार असण्यामागे अनेक वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच आता त्याच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “मध्यंतरी मला एक फोन आला होता, त्यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉण्ड्रीवरती तृतीय पंथीयांच्या वेशात असू शकतो असं समोरच्या व्यक्तीनं मला सांगितलं तसेच त्यांनी मला हेही सांगितलं की, बीड जिल्ह्यातल्या अनेक तृतीय पंथीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे निश्चितच तृतीय पंथीयांसोबत त्यांचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो तिथे असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता. मात्र, त्यामध्ये तथ्य आहे की नाही यामुळे मी तातडीने त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते”, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड १५ आणि १६ डिसेंबरला दिंडोरीचं जे गुरुपीठ आहे अण्णासाहेब मोरे यांचं तिथे मुक्कामाला होता. त्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता हे दोघेही तिथे राहिले आहेत, त्यांना व्हीआयपी वागणूक व्हीआयपी जेवण दिलं गेल आहे. त्यांना माहीत होतं. खंडणीतील आरोपी आहेत, हत्येतील आरोपी आहेत तरीसुद्धा मुद्दामून त्यांना तिथे ठेवलं गेलं असा आरोपीही त्यांनी यावेळी केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे पोलीस आणि सरकारवर अनेकदा टीका देखील झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!