Latest Marathi News
Ganesh J GIF

बागेत तीन महिलांची तरुणीला बेदम मारहाण

मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, लाथाबुक्याने मारहाण करत शिव्यांची लाखोळी, व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं तीन महिलांना एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगरच्या हडको येथील उद्यानात भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बेदम मारहाण केली. एन ११ सिडको परिसरातील उद्यानात २५ वर्षीय तरुणी बसली होती. या तरुणीचा पाठलाग करत अचानक तीन महिला त्या उद्यानात आल्या. मुलीला काही कळण्याच्या आत या महिलांनी तरुणीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तू आमच्या मुलासोबत अफेअर का ठेवते? असं म्हणत त्या महिलांनी तीचे केस ओढत तिला मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या महिलेने, “तुझ्यामुळे आमचा मुलगा आईला शिवीगाळ करतो. तुझ्यामुळे, स्वतःच्या आईचा मृत्यू झाला तर पाणी टाकायला कोणी नसेल असं म्हणतो” असे म्हणत बुक्क्यांनी मारहाण केली. तीनही महिला चांगल्याच संतापल्या होत्या. यामुळे हा वाद टोकाला गेला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भेदरलेल्या मुलीने, यापुढे मी तुमच्या मुलासोबत राहणार नाही. मला मारू नका असं म्हणत विनवण्या करु लागली. पण तरीही, तरुणीला महिलांनी बेदम मारहाण केली. पण या बेदम मारहाणीच्या घटनेच्यानंतर सिडको पोलिसांना कुठलीही तक्रार आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुणीला तीन महिला बेदम मारहाण करत असल्याची घटना बघून उद्यानात एकच गोंधळ उडाला. महिलांचा रौद्ररूप बघून कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!