Latest Marathi News
Ganesh J GIF

नवी मुंबईत महिलेची फसवणूक करणारे लहरी आणि टणटण बाबा पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकमध्ये अशोक खरात बाबाचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील भोंदूबाबांची धरपकड सुरू झालेली असतानाच नवी मुंबई पोलिसांनी टणटण बाबा आणि लहरी बाबा या दोन भोंदूंची घंटी वाजवली आहे.

या दोघांनी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या नावाखाली एका महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर एनआरआय सागरी पोलीस गुन्हा नोंदवून अर्जुन चव्हाण उर्फ टणटण बाबा, सागर शिंदे उर्फ एकलहरी बाबा यांची नाशिक येथून उचलबांगडी केली. भोंदूबाबांचा नवीन अवतार धारण केलेल्या या दोघांनी आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला वारंवार संकटांचा सामना करावा लागत होता. घरात सुख आणि शांती नव्हती. परिस्थितीतून बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करीत असतानाच एकलहरी बाबा आणि त्याचा गुरू टणटण बाबा यांच्या संपर्कात आली.

नातेवाईक आणि दुश्मनांनी तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे. त्यामुळे घरात कोणालाच सुख आणि समाधान मिळत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी अघोरी विद्येच्या सहाय्याने मोठा विधी करावा लागणार आहे. त्यासाठी काळ्या जादूची मदत घ्यावी लागत असल्याने मोठा खर्च येणार आहे, अशी बतावणी दोन्ही भोंदूबाबांनी केली.

हा विधी करण्यासाठी टणटण बाबा आणि एकलहरी बाबाने या महिलेकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. महिलेला भीती दाखवून सुमारे दोन लाख रुपये घेतले. काळी जादू आणि अघोरी विद्यद्येच्या सहाय्याने विधी केल्यानंतरही काहीच फरक पडला नाही. या बाबांनी आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलने एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दोघेही आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे गेले आणि या दोघांवर झडप घातली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!