Latest Marathi News
Ganesh J GIF

२ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ! किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, प्रियकर फरार

पिंपरी-चिंचवड –  पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. आज (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!