दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- शिक्षकाकडे नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी असते. आई वडीलानंतर शिक्षण हा अतिशय महत्वाचा असतो. पण आजकाल या संकल्पनेला तडे जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशाच एका अडाणी शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ मध्ये एक रिपोर्टर शिक्षिकेला एका महिन्याचे स्पेलिंग विचारत आहे. त्यावर शिक्षिकेनं दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. रिपोर्टरने पहिल्यांदा मुलांना जानेवारीची स्पेलिंग विचारली. पण त्यांनी चुकीचे स्पेलिंग सांगितली. पण जेंव्हा शिक्षिकेला जानेवारीची स्पेलिंग विचारण्यात आली तेंव्हा तिने दिलेले उत्तर पाहून अनेकांची करमणुक होत आहे. चुकीचे उत्तर सांगतानादेखील शिक्षिकेचा आत्मविश्वास ठाम होता. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.
सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो त्यामुळे या शिक्षिकेचा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पण असे शिक्षक असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या तरी नेटकरी या व्हिडीओचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहेत.