लग्नानंतरही प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रियकरचा दबाव ; त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय
पुणे – लग्न झाल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. ते घरात माहिती झाल्याने तिने प्रेमसंबंध पूर्णपणे बंद केले. तरीही तिचा प्रियकर प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला. हा दबाव असह्य झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी विवाहितेच्या दिराने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारुती पाटील (वय ३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रेंजहिल्समध्ये १ सप्टेबर रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वहिनी हिचे आरोपी मारुती पाटील याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाबाबत घरात माहिती झाले. त्यामुळे तिने ते पूर्णपणे बंद केले. असे असतानाही मारुती पाटील हा गेल्या मार्च महिन्यांपासून प्रेमसंबंध पुन्हा सुरु करण्यासाठी दबाव टाकत होता. फिर्यादीच्या वहिनीला कॉल व मेसेज करुन धमकावत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वहिनीने १ सप्टेबर रोजी सायंकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे तपास करीत आहेत.