Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री म्हणतेय ‘दुनिया गेली तेल लावत..

अभिनेत्रीची हटके पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, कोल्हापूरी वाक्यप्रचार म्हणत केली मोठी घोषणा, बघा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मराठीतील आघाडीची अभिनेत्री महाराष्ट्राची क्रश आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. प्राजक्ताने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव, पोस्टर आणि सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चित्रपटाचे नाव आणि टॅगलाईन हटके असल्याने याची उत्सुकता वाढली आहे.

अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. प्राजक्ताच्या आगामी सिनेमाचं नाव ‘तीन अडकून सीताराम’ असं असून पुढील महिन्यातच २९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्राजक्तासह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, आनंद इंगळे, ऋषीकेश जोशी, विजय निकम, समीर पाटील, गौरी देशपांडे, शशांक कुलकर्णी अशी स्टारकास्ट असणार आहे. ऋषीकेश जोशी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन आहेत. चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात हटके भाषा वापरण्यात आली आहे. पोस्टरसाठीचे कॅप्शन देखील खास आहे, ‘हे तीन जण तर मजबूत अडकलेत आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायंत! कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच! #तीनअडकूनसीताराम २९ सप्टेंबर पासून फक्त चित्रपटगृहात!’ सिनेमाच्या पोस्टरवर एक हात दिसतो आहे, ज्यामध्ये बेड्या ठोकलेल्या दिसतायंत. शिवाय ‘दुनिया गेली तेल लावत…’ अशी टॅगलाइनही पोस्टरवर दिसते आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ‘तीन अडकून सीताराम’ सिनेमाची ही संपूर्ण टीम लंडनमध्ये शूटिंगसाठी पोहोचली होती. त्यावेळी शुभारंभापासून विविध फोटो प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेले. मात्र त्यावेळी सिनेमाचे नाव मात्र गुलदस्त्यात होते. पण आता चित्रपटाचे हटके नाव समोर आले आहे. ‘तीन अडकून सीताराम’ हा कोल्हापुरातील वाक्यप्रचार आहे. पण त्याचा अर्थ चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमही सोनी मराठीवर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आणि आता चित्रपटातुनही ती भेटीला येणार आहे.

प्राजक्ता एक उद्योजिका देखील आहे. तिचा प्राजक्तराज हा दागिणे ब्रँड खूपच लोकप्रिय आहे. शिवाय तिने नुकतेच कर्जतमध्ये फार्म हाऊस विकत घेतले होते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण प्राजक्ता या सिनेमात कोणत्या भुमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!