Latest Marathi News
Ganesh J GIF

महात्मा गांधीचे खरे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, वक्तव्यामुळे नव्या वादाचे वादंग, राजकारण तापणार?

अमरावती दि २८(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त विधानामुळे सातत्याने चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.

महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगतले जाते पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं खळबळजनक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे म्हणाले की, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. मात्र भिडेंच्या या नवीन वक्तव्यामुळं मोठा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.दरम्यान देशामध्‍ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्‍हणाले आहेत.

भिडे हे वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. त्यांनी विविध विषयांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं मोठे वाद यापूर्वी झाले आहेत. तत्पूर्वी कार्यक्रमापूर्वी भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी कार्यक्रमस्‍थळाजवळ भिडे यांच्‍या विरोधात आंदोलन केले होते. पण त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!