Latest Marathi News
Ganesh J GIF

महायुतीचं एकदाच ठरलं..! अखेर ‘या’ तारखेला होणार शपथविधी, ठिकाणही निश्चित ; भाजपची जय्य्त तयारी सुरु

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला ज्यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झालेला पाहायला मिळाला. तर यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न समोर उपस्थित झाला होता.दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे संकेत देण्यात आले. यांनतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं, मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर देत सांगितले की त्यांचा या निर्णयाला पुर्ण पाठिंबा आहे आणि ते नाराज नसल्याचं त्यांनी सांगितल. तर यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

भाजपचा गटनेता २ डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी १:०० वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळीच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. यासह प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ५ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहि

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!