Latest Marathi News
Ganesh J GIF

महायुतीचं अखेर ठरलं..! देवेंद्र फडणवीसच असणार मुख्यमंत्री, अधिकृत घोषणा बाकी! ‘या’ दिवशी होणार शपथविधी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत काल रात्री बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. केवळ ओपचारिकता बाकी असल्याचे म्हटले जात आहे.

काल रात्री दिल्लीत बैठक झाल्यानांत आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.दरम्यान नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकर पाड पडणार असून मुख्यमंत्रिपदाचा नावाची औपचारिक घोषणेसाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक आज दुपारी दोननंतर वर्षां बंगल्यावर होणार होती. मात्र ही बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलीय.

दुसरीकडे नव्या सरकारचा २ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपनी सुरु असल्याची माहिती मिळते. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क, आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्याने इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!