एकनाथ शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही
राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे खळबळ, शिंदे गटाची अस्वस्थता वाढली, राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षातील ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. काही दिवसांनी शिवसेना पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडेच सोपवण्यात आला. अगदी तसाच प्रकार आता राष्ट्रवादीत होत आहे. पण प्रफुल्ल् पटेल यांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची असा वाद रंगला आहे. निवडणुक आयोग लवकरच यावर निर्णय घेणार आहे. पण त्यापूर्वीच आम्हीच खरे राष्ट्रवादी असा दावा अजित पवार गटाने केला आहे. आता तर नागालँडच्या सर्व आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची ताकत वाढली आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, आमच्या केसमध्ये तसे काही नाही, राष्ट्रवादीची केस पूर्ण वेगळी असून त्याचा आणि शिंदेंच्या केसमध्ये काडीमात्र संबंध नाही असे पटेल म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. ५३ पैकी ४३ आमदार आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आलं आहे. पक्षात निवडणुका पार पडलेल्या नाहीत. असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. आता ३० सप्टेंबरला राष्ट्रवादीचे घड्याळ कोणाला भेटणार हे पहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने फटकारल्यामुळे सुनावणी पुन्हा सुरु झाली. कायदेतज्ञाच्या मते एकनाथ शिंदे सह आमदार अपात्र ठरतील असा अंदाज आहे. त्यातच पटेल यांनी अनेक अडचणी आहेत. असा दावा केल्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. कारण एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवर यांना मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.