Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांचे भरभरून काैतुक

राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवारच कामाचे नेते, म्हणाल्या अजित पवार कामाच्या बाबतीत यांचे भाऊच, गणरायाला साकडे

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी राजकीय प्रश्नावर व्यक्त होत असतात. तसेच आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण एरवी टिका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आज चक्क राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काैतुक केले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमृता फडणवीस अजित पवार यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या की, अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते आहेत. जे चांगलं काम करत आहे. त्यामुळे मला याचा खूप आनंद आहे. अजित दादा भाजपसोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या युती सरकारकडून चांगली कामं होत आहेत. आणि येत्या काळातही होत राहतील, असा विश्वास आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवार चोवीस तास काम करतात, कामाप्रती ते समर्पित आहेत. कामाच्याबाबतीत अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर टिका केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजींनी देशसेवेचे, महाराष्ट्र सेवेचे व जनसेवेचे व्रत हाती घेतले असून, हे सेवाकार्य त्यांच्या हातून सदोदित होत राहावे, असे साकडे बाप्पांकडे घातले आहे. तसेच गणपती बाप्पानी महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सर्वाना सुख, समृद्धी आणि आनंद द्यावा, असा आशीर्वाद मागितला आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच देवेंद्र ज्या पदावर असतील, तिथे छाप पडतात. त्यामुळे अमुक पदासाठी माझा आग्रह नसतो. आगामी २०२४ मध्ये भाजप एक नंबर पार्टी होवो. हीच प्रार्थना देवाकडे केली आहे. राज्यात त्रिदेव सरकार आहे.मी पर्सनली त्यांच्या पाठीशी आहे. असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते प्रशासनाच्या मागे लागून काम करत आहेत. ते काय बोललेत मला माहिती नाही, असं त्या म्हणाल्या. दरम्यान आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका देखील महायुतीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित लढणार असल्याचे बोलले जात आहे.

नागपूरला एवढ्या मोठ्या पावसाची सवय नव्हती. नागपूर पूरपरिस्थिती आकस्मिक आलेले संकट आहे. यासाठी राज्य सरकार व प्रशासन सावध नव्हते. मात्र, दुर्घटना उद्भवल्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे तळ ठोकून आहेत. प्रशासन आपत्ती निवारणाचे काम वेगाने करत आहे. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी काटेकोरपणे नियोजन करायला हवे. नद्या, तलाव का तुंबत आहे, याचा विचार केला पाहिजे,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!