Just another WordPress site

 इंडिगो विमानाच्या इंजिनला अचानक आग

आगीचा व्हिडिओ व्हायरल, सरकारने दिले हे आदेश

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- दिल्लीहून बेंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिग करावे लागले आहे. उड्डाण सुरु असताना विमानातून अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्याने हे लँडिग करावे लागले.विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पण सरकारने डीजीसीएला या घटनेसंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इंडिगो फ्लाइट क्रमांक A320 मध्ये ही आगीची घटना घडली. बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोचे विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत असतानाच एक ठिणगी उडाली. उठाली. त्यानंतर आगीच्या ज्वाळांना सुरुवात झाली. त्यामुळे पायलटने इमर्जन्सी लँडिंग केले. यावेळी विमानात १८० जण होते. हे सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांच्या यशस्वीरित्या दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. इंडिगोने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे. तथापी याची चाैकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

GIF Advt

इंडिगोने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. विमानात १८० जण होते. हे सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांच्या यशस्वीरित्या विमानातून बाहेर काढण्यात आले. हे विमान पुन्हा कधी उड्डाण करु शकेल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण अलीकडे विमानात अचानक आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!