मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ ट्रेंडिगला येत असतात. आणि धुमाकूळ घालतात सध्या एका मराठमोळ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नऊवारी आणि नाकात नथ घालून तिने केलेले रॅप लोकांच्या पसंतीत उतरत आहे.
सोशल मिडीयावर अनोखे हिप हाॅप करत मराठमोळ्या तरुणीने सर्वांना वेड लावल आहे. अमरावतीची आर्या जाधाव अलीकडेच MTV. वरील Hustle २.o या कार्यक्रमात दिसून आली. यावेळी तिने चक्क नऊवारी साडी नाकात नथ घालून मराठीत रॅप सादर केला. आर्याच्या अस्सल मराठमोळ्या पेहरावाने आणि त्याहूनही तिच्या स्पष्ट शब्दांनी तिने सर्वांचं मन जिंकले आहे. नऊवारी, मोकळे केस, नाकात नथ व चंद्रकोर आणि त्याला फ्युजनचा तडका देण्यासाठी पायात शूज असा भन्नाट लुक घेऊन आर्या आली आणि तिने मराठीत रॅप करत प्रेक्षकांची मने जिंकली.आर्याने केलेली शब्दांची गुंफण इतकी सुंदर होती की बादशाह सुद्धा तिचं कौतुक करताना स्वतःला थांबवू शकला नाही.
आर्या जाधव मूळची अमरावतीची आहे. करोना काळात तिला रॅपची कल्पना सुचली. घराच्या छतावर बसून तिने रॅप लिहायला सुरुवात केली. नंतर शूट करून ती आपल्या सोशल मीडीयावर शेअर करु लागली आणि तिला प्रसिद्धी मिळत गेली.