विवाहित महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
संकटांचा सामना करत प्रेमविवाह, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात, काजलने टोकाचे पाऊल का उचलले?
अकोला दि १(प्रतिनिधी)- मूर्तीजापूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्या प्रकरणात अलीकडे वाढ झाली आहे.
काजल कांबे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजल कांबे स्वतःची स्कूटर घेवून चिखली गेट परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गेल्या. पुणे-अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच काजलने रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वे चालकाच्या लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले. मात्र, तोपर्यंत गाडी काजलच्या शरीरावरून गेली होती. रेल्वेवरुळाजवळ त्यांची देखील पर्स आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण या ठिकाणी येण्याआधी त्या रेल्वे इंजिन जवळ गेल्या होत्या. पण तिथे त्यांना हटकण्यात आल्यामुळे त्या तिथेन रेल्वे ट्रॅककडे गेल्या होत्या. काजलचे लग्न सहा वर्षांपूर्वी संकेत कांबे बरोबर झाले होते. प्रतिष्ठित डॉक्टर राजेश कांबे यांच्या काजल सुन होत्या. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण काजलच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी काजल यांचा मोबाईल ताब्यात घेतला असुन त्यातून काही सुगावा लागतो का? याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर काजल यांच्या लग्नावेळी संकेत यांना एका मुलीने लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे ती शक्यता लक्षात घेऊनही पोलीस तपास करत आहेत. पोलीस निरिक्षक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.