Just another WordPress site

‘ज्या मातोश्रीने आधार दिला त्यांच्यावरच आरोप करताय’

रामदास कदम यांच्या वक्तव्याचा जोडे मारत निषेध दिला हा इशारा

पुणे दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवाराविषयी अनुद्गार काढणाऱ्या रामदास कदम यांच्या पोस्टरला जोडा मारून शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनिकांच्या वतीन बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रामदास कदम म्हणाले  होते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. मासाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ तीनवेळा गेले. ईतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या. असा सणसणीत आरोप रामदास कदम यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर शिवसेनिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

GIF Advt

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले की, ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसेनीकांना आधार दिला. त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!