… म्हणून खैरेंनी आक्रमक होत हातात घेतला बुट
चंद्रकांत खैरेंनी इतका राग का आला? नेमके काय झाले ही बातमी वाचा
ऒैरंगाबाद दि २१ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर रामदार कदम यांच्या विरोधातील असंतोष वाढत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कदम यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तर रामदास कदम यांना शिवसेना स्टाईल इशारा दिला आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चंद्रकांत खैरे रामदास कदम यांच्याविरोधात आक्रमक दिसून आले. “शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें विरोधात बोलाल तर तुमचे थोबाड रंगवू, असा इशारा देताना संतापेल्या खैरेंनी चक्क पायातील बूट काढले. ज्या उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना संभाळेले,मंत्री केले त्यांच्याबद्दल कदम असे विधान करतात. एवढं सर्व काही देऊन हा माणूस उद्धव ठाकरेंबद्दल अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांचा मेंदू सडला आहे की काय अशी शंका येते असे खैरे म्हणाले. ओैरंगाबादचे पालकमंत्री असताना रामदास कदम यांनी काय काय उद्योग केले हे आपल्याला माहित असल्याचेही खैरे म्हणाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी रामदास कदम यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचवेळी खैरे यांनी हा इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्हीबाजुंनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावेळी ब-याच वेळा पातळी सोडून टिका करण्यार येत असते. त्यामुळे अनेक वेळा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होत असल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो.