Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची पोलिसांना शिवीगाळ

शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, हप्ते घेत असल्याचा केला आरोप

नागपूर दि ६(प्रतिनिधी) – नागपूरमधील रामटेकचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जायस्वाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आशिष जयस्वाल पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचे दिसत असल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.

राज्यात भाजप शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिंदे गटाचे आमदार वादात आहेत. मारहाण शिविगाळ धमकी देण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत असल्याने विरोधकांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाना साधला आहे. मध्यंतरी संतोष बांगर यांचे मारहाण प्रकरण शांत होत असताना जयस्वाल वादात सापडले आहेत. नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आठवळी बाजारात गावगुंडांनी तलवारी फिरवत हैदोस घातला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांची गुंडांना भीती वाटत नाही, पोलीस अवैद्य धंदे वाल्याकडून हप्ते घेतात. त्यामुळे कन्हान शहरात अशा घटना घडतात, असा आरोप करत आमदार आशिष जायस्वाल यांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

 

कन्हान येथे काही गावगुंडानी हातात तलवार फिरवत हैदोस घातला होता. विशेष म्हणजे हे गावगुंड अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोर्चा काढत संताप व्यक्त केला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!