Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो इतका पगार आणि भत्ता

आमदारांच्या पगाराचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल,माहिती अधिकारातून पगार समोर

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- खासदार आणि आमदारांना मिळणाऱ्या पगाराबाबत नेहमीच चर्चा होत असते. महाराष्ट्रातील आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे. अशातच एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीत आमदारांच्या वेतनाचा आकडा समोर आला आहे. तो आकडा पाहुन तुम्ही सुद्धा चकित व्हाल असा तो पगार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाकडून त्यांना माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला २ लाख ७१ हजार ९४७ रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. या माहितीत विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रुपये, महागाई भत्ता ३४ टक्के असून तो ६९ हजार ९४८ रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता १० हजार रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता १० हजार रुपये अशी एकूण २ लाख ७२ हजार १४८ रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन २ लाख ७२ हजार ९४७ रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. आमदारांच्या वेतनावर होणारा खर्च किती तरी कोटीच्या घरात गेल आहे. अनेक आमदार करोडपती आहेत. तरीही ठराविक कालावधीनंतर आमदारांचे वेतन वाढवण्यात येत असते.


आधीच महाराष्ट्रात कर्जात बुडत चालला आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संपावर गेला आहे. शेतकरी हमीभावासाठी आक्रमक आहेत. त्यामुळे आमदारांचा पगार हा मुद्दा चर्चेत आला आहे.मात्र याला काही आमदार अपवाद मात्र निश्चितच आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!