करोडो रुपये लुटणारी मोना दहा रूपयांच्या फ्रुटीमुळे अडकली
हसीनाला पोलीसांनी केली अटक, पंजाब पोलिसांचे काैतुक, काय आहे 'चल राणी मधमाशी पकडू' ऑपरेशन
मोहाली दि २०(प्रतिनिधी)- पंजाबमधील लुधियाना येथे ८ कोटी ४९ लाख रुपयांच्या चोरीची सूत्रधार ‘डाकू हसिना’ मनदीप कौर उर्फ मोना हिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पण कोट्यावधीची लुट करणारी ही महीला फक्त दहा रुपयांमुळे पोलिसांच्या हाती लागली.
पोलीसांनी अत्यंत शिताफीने त्या महिलेला अटक केली आहे. १० जूनच्या रात्री काही लोकांनी सीएमएस सिक्युरिटीजची कॅश व्हॅन चोरली होती. या व्हॅनमध्ये ८ कोटी ४९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही व्हॅन जप्त केली असता, त्यात पोलिसांना शस्त्रे आणि पिस्तूलही सापडले. यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपींना पकडण्यासाठी लुधियाना पोलिसांनी सायबर टीमची मदत घेऊन जीपीएस व्हॅनचा माग काढला आणि परिसरातील मोबाइल टॉवरचा तपशीलही काढला. यावेळी पोलिसांनी ५ कोटी रुपये जप्त केले. तसेच पाच जणांना अटक केली. मात्र, सूत्रधार मोना आणि तिचा पती अद्याप फरार होते. पोलिसांना ५००-५०० च्या नोटांचे बंडल असलेला मोनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सापडला. तसेच ती हेमकुंड साहिब या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. मनदीप कौन उर्फ मोना हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी पोहोचली होती. यानंतर पोलिसांनी मोनाला पकडण्यासाठी फ्रुटीची मोफत सेवेचा सापळा रचला होता. ही फ्रूटी घेण्यासाठी मोना थांबली आणि पकडली गेली. आता एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ कोटी ९६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. करोडो रुपये लुटणारी मोना १० रुपयांच्या फ्रूटीच्या मोहाने हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात अडकली आहे. डाकू हसीनाला झटपट श्रीमंत व्हायचे होते, म्हणून ती चोऱ्या करायची असे तपासात समोर आले आहे. इतरांचा शोध सुरु आहे.
या प्रकरणाची उकल करणाऱ्या पोलिस पथकाला १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिसांचे पथक त्यांच्या शोधात गुंतले आहे. पोलिसांनी या ऑपरेशनला ‘चला राणी मधमाशी पकडू’ असे नाव दिले होते.